‘उत्तर रामायण’मध्ये स्वप्नील जोशीबरोबर झळकलेला अभिनेता आता करतोय ‘हे’ काम; वाचा…
१९८० च्या दशकात 'रामायण' मालिकेच्या यशानंतर आलेल्या 'उत्तर रामायण'मध्ये स्वप्नील जोशीने 'लव' आणि मयूरेश क्षत्रमाडेने 'कुश'ची भूमिका साकारली होती. स्वप्नील जोशी मराठी सिनेसृष्टीत यशस्वी झाला, तर मयूरेशने अभिनय सोडून शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मयूरेशने 'वर्ल्ड बँक'मध्ये काम केले आणि 'कमिशन जंक्शन'च्या सीईओ पदावर पोहोचला. आज तो न्यूयॉर्कमध्ये यशस्वी उद्योजक आहे.