Video: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत ट्विस्ट; अंशुमन करणार असं काही की…
Veen Doghatli Hi Tutena Upcoming Twist: 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत दाखविल्याप्रमाणे, स्वानंदीची आई मंदाकिनीने समरच्या क्रेडिट कार्डचा वापर करून दहा लाखाचा खर्च केला. याबद्दल कोणालाच कल्पना नव्हती. जेव्हा हे प्रकरण समोर आले. त्यावेळी स्वानंदीच्या वडिलांनी समरचे दहा लाख मी परत करेन असे सांगितले. आता ते ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.