“दीड पानांचा सीन…;” ‘पवित्र रिश्ता’साठी ऑडिशन देताना रागावलेल्या उषा नाडकर्णी
अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मराठी-हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'पवित्र रिश्ता' मालिकेत सविता देशमुख ही भूमिका साकारत त्यांनी हिंदी प्रेक्षकांनाही भुरळ घातली. 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 'पवित्र रिश्ता'साठी ऑडिशनचा अनुभव सांगितला. अंकिता लोखंडे व सुशांत सिंह राजपूत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं.