मालिकेला निरोप देताना भावुक झाली लीला, जुने क्षण शेअर करत म्हणाली, “सुंदर प्रवासाचा शेवट…”
झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अपेक्षित टीआरपी मिळत नसल्याने ही मालिका बंद होणार आहे.मालिकेच्या निरोपाबद्दल कलाकारांनी त्यांच्या भावुक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच मालिकेतील लीला म्हणजेच मुख्य अभिनेत्री वल्लरी विराजनेही भावुक पोस्ट शेअर केली आहे. यासह तिने "एका सुंदर प्रवासाचा शेवट होत आहे" असं म्हटलं आहे. दरम्यान, मालिकेचा शेवट लीलाचं डोहाळेजेवण साजरं करून गोड होईल.