‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, पाहा नवा प्रोमो
'झी मराठी' वाहिनीवर 'सावळ्याची जणू सावली' नावाची नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे निर्मित या मालिकेत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर झळकणार आहे. प्रोमोमध्ये पांडुरंगाची भक्ती करणारी सावळीशी मुलगी दाखवली आहे. मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली असून, मालिकेच्या प्रसारणाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.