ऐरोली काटई उन्नत मार्गासाठी भूसंपादन ! काटईतील तीन हेक्टर जागेचे भूसंपादन सुरू
ठाणे : ऐरोली-काटई नाका उन्नत मार्गाच्या काटई नाका परिसरातील पुढील कामाला आता गती मिळणार असून, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या काटई गावातील सुमारे तीन हेक्टर जागेच्या भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने अखेर सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या जागेचे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर काटईपासून प्रकल्पातील बोगद्यापर्यंत जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे ऐरोली-काटई उन्नत मार्गाच्या या भागातील भूसंपादनाचा अडथळा दूर होण्याच्या मार्गावर आहे.