भिवंडीत गुलाबजामच्या भांड्यात उंदीर फिरतानाचा व्हिडीओ प्रसारित होताच एफडीएचा छापा
ठाणे: भिवंडी येथील शांतीनगर भागातील एका गुलाबजाम विक्रीच्या दुकानात गुलाबजाम ठेवलेल्या भांड्यात उंदीर फिरत असल्याचा ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली. या ध्वनिचित्रफितीबाबत माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या पथकाने संबंधित दुकानावर बुधवारी छापा टाकून ते बंद करण्यात आले. दुकानदाराकडे अन्न व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रे नसल्याची बाब कारवाईदरम्यान उघडकीस आली आहे.