डोंबिवली पश्चिमेतील अनमोलनगरी रिंगरूटवरील बेकायदा बाजारावर कारवाई
डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा भागातील अनमोलनगरी भागातील १०० फूटी बाह्यवळण रस्त्यावर (रिंगरूट) मागील चार महिन्यांपासून बेकायदा बाजार दर गुरूवारी भरवला जात होता. काही स्थानिक दादा-भाई या बेकायदा बाजाराचे नियोजन करत होते. या बेकायदा बाजाराची माहिती गुरूवारी संध्याकाळी पालिका ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त अभिमान पवार यांना मिळताच, त्यांनी फेरीवाला हटाव पथकाच्या माध्यमातून या बेकायदा बाजारातील दोन हजार फेरीवाल्यांवर कारवाई केली.