घोडबंदर तब्बल साडेपाच तास अंधारात! पहाटे ४ वाजता वीज गेल्याने नागरिकांचे हाल
ठाणे : मंगळवारी पहाटे सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसादरम्यान घोडबंदर येथील कसरवडवली, आनंदनगर भागातील वीजपुरवठा पहाटे ४ वाजता खंडित झाला. साडेपाच तासांनतर वीजपुरवठा पूर्ववत झाला. मात्र, याचा फटका घरातून कार्यलयीन कामकाज करणारे नोकरदार वर्गाला बसला.