मध्य रेल्वेचा सलग चौथ्या दिवशी खोळंबा, कर्जत बदलापूरच्या दरम्यान लोकल वाहतूक विस्कळीत
मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. सलग चौथ्या दिवशी पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. नेरळ-भिवपुरी स्थानकांवर पाणी साठल्याने बदलापूर ते कर्जत लोकल सेवा ठप्प झाली आहे. मुंबईकडून येणाऱ्या लोकलही उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेने ही माहिती दिली आहे की पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा विस्कळीत राहील.