“रमेश म्हात्रेचं नगरसेवक पद काढून घेत त्याची धिंड काढा”; आदित्य ठाकरेंची मागणी
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारावरून वाद निर्माण होऊन शिवसेनेचे (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरांमध्ये संताप उसळला. आदित्य ठाकरे यांनी म्हात्रेंना अटक करून पद काढून टाकण्याची मागणी केली. म्हात्रेंनी महिला डॉक्टरवर हात उचलल्याचा आरोप फेटाळला आहे.