कल्याण-बदलापूर, आसनगाव चौथी रेल्वे मार्गिका लवकरच; प्रवाशांना दिलासा मिळण्याची चिन्हे
मध्य रेल्वेवरील वाढती प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी कल्याण-बदलापूर आणि कल्याण-आसनगाव चौथ्या मार्गिकेचे काम सुरू असून हि मार्गिका तातडीने पूर्ण करण्याबाबत खासदारांच्या विभागीय बैठकीत गुरूवारी चर्चा झाली. यामुळे कामाला गती येऊन या मार्गिकेचा काम लवकरच पुर्ण होण्याची चिन्हे आहेत. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यास अधिक लोकल फेऱ्या सुरू करणे शक्य होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.