कल्याणमध्ये खडकपाडा भागातील गंधारनगर रस्त्याची दुरवस्था
कल्याण - कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील सर्वाधिक वर्दळीच्या गंधारनगर भागातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी पालिका हद्दीतील रस्ते सुस्थितीत करा, असे आदेश आयुक्त अभिनव गोयल यांनी देऊनही गंधारनगर भागातील रस्त्यावरील खड्डे सुस्थितीत केले जात नसल्याने परिसरातील नागरिक, प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.