कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेसच्या खिडकीत हात घालून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली
कल्याण - ठाणे येथील एका ज्येष्ठ नागरिक महिला दोन दिवसापूर्वी ठाणे ते तमीळनाडू कोनार्क एक्सप्रेसने नातेवाईकांसोबत प्रवास करत होत्या. एक्सप्रेस सोमवारी दुपारी कल्याण रेल्वे स्थानकात आली. ज्येष्ठ नागरिक महिला एक्सप्रेस डब्याच्या खिडकीत बसल्या होत्या. त्या फलाटाच्या दिशेने पाहत होत्या. अचानक एक इसम खिडकीजवळ आला. त्याने ज्येष्ठ नागरिक महिलेला काही कळू न देता क्षणार्धात या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळून गेला.