कसारा-आसनगाव रेल्वे ब्लॉक दरम्यान आसनगाव ते कसारा, नाशिक एस. टी. बस धावणार
कल्याण - कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी मध्य रेल्वेने ७ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान कसारा ते आसनगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान विशेष मेगा ब्लाॅक जाहीर केला आहे. या मेगाब्लाॅकच्या कालावधीत कसारा, नाशिकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने शहापूर, कल्याण, इगतपुरी एस. टी. बस आगारातून विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. कसारा ते आसनगाव रेल्वे स्थानक, आसनगाव ते नाशिक अशा या बस प्रवासी गर्दीप्रमाणे धावणार आहेत.