राज्यातील पहिले ‘आऊटलेट माॅल’ भिवंडीत, ७० टक्क्यांपर्यंतची मिळणार सूट
राज्यातील पहिल्या समर्पित ‘आउटलेट मॉल’चे उद्घाटन भिवंडीत झाले असून या माॅलला ‘आऊटलेट माॅल ऑफ इंडिया’ असे नाव दिले गेले आहे. भुमी वर्ल्ड समूहाने विकसित केलेला हा मॉल भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या भिवंडी बायपास जवळ सुरू झाला असून, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) ग्राहकांसाठी तो नवे आकर्षण ठरणार आहे.