“तू टपरी टाक, आयुक्तांशी राज ठाकरे बोलून घेतील”, डोंबिवलीत मराठी मुलीसाठी मनसे धावली
डोंबिवलीतील मराठी मुलीच्या शॉरमा विक्रीच्या हातगाडीवर सातत्याने कारवाई होत असल्याने तिने व्हिडिओ प्रसारित केला. हा व्हिडिओ राज ठाकरेंपर्यंत पोहोचला. राज ठाकरेंनी अविनाश जाधव यांना लक्ष घालण्यास सांगितले. जाधवांनी मुलीची व्यथा जाणून घेतली. मुलीने सांगितले की, परप्रांतीयांवर कारवाई न होता तिच्यावरच होते. जाधवांनी तिला दिलासा देत, अडचणींवर मदत करण्याचे आश्वासन दिले.