पाच जणांचे बळी घेणाऱ्या मुंब्रा अपघाताला वर्ष पूर्ण, त्या दिवशी काय झाले होते? वाचा…
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ ९ जून २०२५ रोजी दोन उपनगरीय रेल्वेगाड्यांमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. अपघाताच्या चौकशीत रेल्वे रुळांवरील पाणी आणि देखभाल दुरुस्तीच्या त्रुटींचा उल्लेख आहे. अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाला असून, न्यायालयीन प्रक्रियेत ते सध्या आहेत.