घोडबंदरमध्ये पाण्याचा ठणठणाट; टाक्या असूनही नागरिक टँकरच्या भरवशावर
ठाणे : घोडबंदरमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून अनेक भागांतील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेच्या पाण्याच्या टाक्या असूनही त्यात पाणी नाही, पम्प बंद आहेत, तर काही कामे वर्षानुवर्षे रखडली आहेत. त्यामुळे विद्यमान नागरिकांची तहान भागविण्याची क्षमता नसताना नव्या बांधकामांना मात्र परवानग्या दिल्या जात असल्याने महापालिकेच्या नियोजनावर नगरसेवकांनी शुक्रवारच्या सर्व साधारण सभेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.