ठाणे महापालिकेतील शिपाईदेखील लाचखोर, प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली अडीच हजार रुपयांची लाच
ठाणे : मालमत्ताकराच्या पावतीमधील नावात बदल केलेले प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वागळे इस्टेट प्रभाग समितीतील मालमत्ता कर वसुली विभागातील शिपाईला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या कार्यालयातच अडीच हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. देवेंद्र कोळी (४३) असे अटकेत असलेल्या शिपायाचे नाव असून कारवाईमुळे ठाणे महापालिकेतील लाचखोरीचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.