…तर त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात महायुतीतील काही जागांवर उमेदवारी अर्जांवरुन धुसफूस सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जून पर्यंत आहे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून योग्य निर्णय घेतील. ठाणे पालघर मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीचे प्राबल्य असल्याने निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्याची शक्यता आहे.