शिंदे शिवसेना विरुद्ध भाजप; करवाढीवरून महायुतीत वाद चव्हाट्यावर, ठाण्यात नेमकं काय झालं?
ठाणे : ठाणे महापालिका मालमत्ता कर दरवाढीच्या निर्णयावरून सत्ताधारी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष व भाजप महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडली आहे. करवाढीला भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर शिंदे गटाने भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.