रिंग मेट्रोच मार्गावरून शिंदेसेनेत संघर्ष; सरनाईकांच्या पर्यायी मार्गाला नगरसेवकांचा विरोध
ठाणे - ठाणे : ठाणे अंतर्गत रिंग मेट्रोच्या मार्गावरून शिंदेसेनेतच मतभेद उफाळून आले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गाला स्थानिक नगरसेवकांनी विरोध करत ‘रिंग मेट्रो हवीच, पण मूळ मार्गावरच हवी’ अशी भूमिका घेत मानवी साखळी आंदोलन केले. त्यामुळे सरनाईक विरुद्ध स्थानिक नगरसेवक असा सामना रंगला आहे.