नोकरी हवी आहे? २९ सप्टेंबरला ठाणे जिल्ह्यात रोजगार महाकुंभ; कुठे-कुठे होणार मेळावा?
ठाणे : सुशिक्षित बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यांतर्गत ठाणे जिल्ह्यात १७ ठिकाणी सकाळी १० वाजता प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे.