ठाण्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ भागांमध्ये २४ तास पाणी नाही
ठाणे शहरातील आनंदनगर ते साकेतदरम्यान उन्नत मार्गाच्या कामामुळे जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे १२ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते १३ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, रामनगर आणि येऊर परिसरातील पाणीपुरवठा प्रभावित होईल. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतरही कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे.