Video : वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवताना धक्काबुक्की, भाजप आमदार पडल्या रेल्वे ट्रॅकवर
BJP MLA Sarita Bhadauria Viral Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबाद येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आग्रा-वाराणसी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, या वंदे ट्रेनच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी अनेक राजकीय नेतेमंडळी इटावा स्थानकावर पोहोचली होती. यावेळी इटावातील भाजपा आमदार सरिता भदौरियादेखील कार्यक्रमस्थळी पोहोचल्या होत्या. मात्र, यावेळी त्यांच्याबरोबर एक धक्कादायक घटना घडली. या घटनेतून त्या थोडक्यात बचावल्या. या घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.