‘राहुलजी तुम्ही पंतप्रधान होणार आहात’, भाजपा खासदार रवी किशन काय बोलून बसले?
भाजपाचे खासदार रवी किशन यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांना थेट पंतप्रधान म्हणून संबोधले आहे. राहुल गांधींनी एका कार्यकर्त्याला कोपराने धक्का दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रवी किशन म्हणाले, "तुम्ही पंतप्रधान होणार आहात आणि स्वतःच्याच कार्यकर्त्यांना मारता, याचा अर्थ तुम्ही देशाला किती कोपरे माराल." त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनांवरही टीका केली आणि राहुल गांधींच्या कृतींमुळे जनता वैतागली असल्याचे म्हटले.