भावाला वर्दीत पाहताच अश्रू अनावर; पहिल्या ‘सलामी’चा व्हिडिओ व्हायरल
मुंबई पोलीस भरतीसाठी मेहनत करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक लहान भाऊ पोलीस झाल्यानंतर आपल्या वनरक्षक मोठ्या भावाला वर्दीत भेटतो. मोठा भाऊ भावुक होतो आणि लहान भाऊ त्याला सलाम करतो. या व्हिडिओने अनेकांना भावूक केले आहे. नेटकऱ्यांनी या भावांच्या प्रेमाचे कौतुक केले आहे.