हजेरी लावण्यासाठी महिला शिक्षिकेकडे शिक्षकाची संतापजनक मागणी; म्हणाला, “आधी गालावर..”
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील सरकारी शाळेत एक संतापजनक घटना घडली आहे. एका व्हायरल व्हिडीओमध्ये, पुरुष शिक्षक महिला शिक्षिकेकडून हजेरीसाठी गालावर चुंबन मागत आहे. यासाठी शिक्षिका स्पष्ट नकार देते. सोशल मीडियावर या घटनेवर संताप व्यक्त होत असून, शिक्षकावर कारवाईची मागणी केली जात आहे.