‘३० वर्षांखालील ब्राह्मण कुमारिका वधू पाहिजे’, घटस्फोटिताची अपेक्षा,सोशल मीडियावर वाद का ?
सोशल मीडियावर मॅचमेकर ओएंद्रिला कपूर यांनी एका घटस्फोटित आयआयटीयन पुरुषाच्या वधूसाठीच्या अपेक्षा पोस्ट केल्या. या पुरुषाला ३० वर्षांखालील, ब्राह्मण, कुमारिका मुलगी हवी आहे, जिने कोणत्याही पुरुषाशी पूर्वी संबंध ठेवलेले नसावेत. या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या मागण्यांची खिल्ली उडवली असून, मानसोपचार तज्ज्ञांनीही या अपेक्षांना चुकीचे म्हटले आहे.