तुकाराम मुंढेंची मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेवर मात; सोशल मीडियावर बोलबाला
ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी इन्स्टाग्रामवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागे टाकले आहे. मुंढे यांचे ३७ लाख फॉलोअर्स असून त्यांचा एंगेजमेंट दर २०.३५ टक्के आहे. त्यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदावर असताना राज्यभरात भेसळविरोधात व्यापक मोहीम उघडली आहे. त्यांच्या धाडसी कारवायांमुळे ते जनतेत लोकप्रिय ठरले आहेत.