VIDEO : मराठी बोलण्यास नकार दिल्याने जोडप्याने डिलिव्हरी बॉयला पिझ्झाचे पैसे नाकारले,
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेवरून वाद सुरू आहेत. भांडूपच्या साई राधे इमारतीत एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक मराठी जोडपं पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीशी मराठीत बोलण्याच्या मुद्द्यावरून भांडताना दिसत आहे. डिलिव्हरी एजन्टने हिंदीत बोलण्याचा आग्रह धरला, तर जोडप्याने मराठीत बोलण्याची सक्ती केली. हा वाद सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सने संताप व्यक्त केला आहे.