कोण आहेत IPS शिवदीप लांडे? मराठी अधिकाऱ्याने अचानक राजीनामा का दिला?
बिहारचे लोकप्रिय आणि दबंग आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी १९ सप्टेंबर रोजी अचानक राजीनामा दिल्याची घोषणा केली. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली. लांडे यांनी बिहारमध्ये १८ वर्षे सेवा दिली असून, राजीनामा दिल्यानंतरही बिहारमध्येच राहून सेवा करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, पुढे काय करणार याबाबत त्यांनी काहीही सांगितलेले नाही.