Video: महिला बाईकरचा पाठलाग करत मद्यधुंद कार चालकाची जोरदार धडक; थरारक व्हिडीओ आला समोर
गुरुग्राममधील गोल्फ कोर्स मार्गावर एका महिला दुचाकीस्वाराला हिट अँड रन प्रकारात जखमी करण्यात आले. सिया नावाच्या महिलेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मदतीची मागणी केली आहे. कार चालकाने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. सियाच्या मित्राने कारचा पाठलाग केला पण चालकाने धडक नाकारली. या घटनेमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.