Laws For Women : प्रत्येक महिलेला हे पाच कायदे माहित असायलाच हवेत!
भारतात महिलांसाठी विविध कायदे आहेत जे त्यांना संरक्षण आणि हक्क देतात. समान वेतनाचा अधिकार, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाविरोधातील कायदा, प्रसूती रजेचा अधिकार, कौटुंबिक हिंसाचाराविरोधात हक्क, आणि मोफत कायदेशीर मदतीचा अधिकार हे प्रमुख आहेत. या कायद्यांमुळे महिलांना शारीरिक, भावनिक, आर्थिक आणि सामाजिक संरक्षण मिळते. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वातंत्र्य वाढले आहे.