साहित्य –
* आठ ब्रेड स्लाइस,
* अर्धी वाटी बटर,
* अर्धी वाटी क्रीम चीज,
* अर्धी जुडी बारीक चिरलेली कोथिंबीर,
* तीन ते चार हिरवी मिरची बारीक चिरलेली,
* पाच ते सहा पाकळ्या लसूण,
* मीठ चवीनुसार.
कृती –
एका भांडय़ात बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लसूण, बटर, क्रीम चीज, मीठ टाकून सर्व एकत्रित करावे. ब्रेडच्या साइड कापून त्यावर हे मिश्रण स्प्रेड करावे. मायक्रो मीडियमवर दोन मिनिटे व मायक्रो हायवर एक मिनिट ठेवावे. बाहेर काढून त्रिकोणी कापून सव्‍‌र्ह करावे.

शिंगाडय़ांची खीर
साहित्य –
* २५० ग्रॅम भाजून सोललेले शिंगाडे,
* दोन चमचे तूप,
* दोन चमचे काजू पावडर,
* दोन चमचे बदाम पावडर,
* अर्धा चमचा वेलची पावडर,
* पाऊण लिटर दूध,
* अर्धी वाटी साखर.
कृती –
शिंगाडे मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. दूध आटवून जाडसर करून घ्यावे.
काचेच्या मोठय़ा बाऊलमध्ये वाटलेले शिगांडे आटवलेले दूध, तूप, काजू पावडर, वेलची पावडर व साखर टाकून नीट हलवून मिक्स करून घ्यावे व मायक्रो मीडियमवर पाच मिनिटे ठेवावे. गरम गरम खीर सव्‍‌र्ह करावी.

a man dancing with a box of fireworks on his head
धक्कादायक! हातात पेटवलेल्या फटाक्यांची पेटी धरून डान्स करत होता, पुढे असे काही घडले.. VIDEO व्हायरल
Stale vs fresh roti Find out which one might help regulate blood sugar
रात्री फ्रिजमध्ये ठेवलेली पोळी सकाळी खावी का? शिळी पोळी रक्तातील साखरेचे नियमन करू शकते का? तज्ज्ञ काय सांगतात
Clean stained sheets without a washing machine
वॉशिंग मशिनशिवाय मळलेल्या चादरी कशा कराव्या साफ, जाणून घ्या सोप्या टिप्स
Learn How To Cook instant rava kurdai At Home
रवा न भिजवता, चीक न पाडता बनवा झटपट चौपट फुलणारी रवा कुरडई; जाणून घ्या कृती

बटाटा व सुरण कीस रोस्टी
साहित्य –
* तीन ते चार किसलेले बटाटे, * अर्धी वाटी हाफफ्रेश शेंगदाणे,
* एक चमचा जिरे, * तेल,
* पाव किलो सुरणाचा कीस, * चवीनुसार मीठ.
कृती –
एका कढईमध्ये पाणी घेऊन किसलेला बटाटा अर्धा शिजवून घ्यावा. नंतर किसलेला सूरणही पाण्यात अर्धा शिजवून घ्यावा. अर्धा शिजवून घेतलेला बटाटा व सूरण कीस एका बाऊलमध्ये काढून त्यात अर्धी वाटी हाफफ्रेश शेंगदाणे टाकून मिश्रण एकत्र करावे.
एका काचेच्या पसरट प्लेटमध्ये थोडेसे तेल टाकून रोस्टी थापून घ्यावे व मायक्रो मीडियमवर तीन मिनिटे ठेवावे.
ती काचेची प्लेट काढून रोस्टी उलटे करावे व परत काचेची प्लेट मायक्रो मीडियमवर तीन मिनिटे ठेवावे ही रोस्टी दह्यबरोबर सव्‍‌र्ह करावी. ही साधारणत: उपवासाच्या दिवशी खातात.

केळी आणि वऱ्याच्या तांदळाचे थालीपीठ
साहित्य –
* एक वाटी वऱ्याच्या तांदळाचे पीठ, * चार ते पाच केळी,
* एक वाटी हाफ फ्रेश शेंगदाणे, * एक चमचा सागर,
* एक चमचा जिरे, * चवीनुसार मीठ,
* एक वाटी दही.
कृती –
एका बाऊलमध्ये चार केळी कुस्करून, वऱ्याच्या तांदळाचे पीठ, एक वाटी हाफ फ्रेश शेंगदाणे, एक चमचा जिरे व चवीनुसार मीठ टाकावे.
नंतर या मिश्रणात पाणी टाकून हे मिश्रण मळून घ्यावे. एका काचेच्या पसरट प्लेटमध्ये थोडेसे तेल टाकून थालीपीठ थापून घ्यावे व मायक्रो मीडियमवर तीन मिनिटे ठेवावे.
ती काचेची प्लेट काढून थालीपीठ उलटे करावे व परत ती काचेची प्लेट मायक्रो मीडियमवर तीन मिनिटे ठेवावे. हे थालीपीठ दह्यबरोबर सव्‍‌र्ह करावे. हे साधारणत: उपवासाच्या दिवशी खातात.

चिली मेथी सूप
साहित्य –
* दोन जुडी मेथी,
* चार ते पाच हिरवी मिरची,
* पाच ते सहा पाकळ्या लसूण,
* एक चमचा कॉर्नफ्लॉवर,
* एक कप क्रीम,
* अर्धा चमचा काळी मिरी,
* मीठ चवीनुसार
कृती –
मेथी, हिरवी मिरची, लसूण मिक्सरमध्ये वाटून घ्यावा. हे सर्व मिश्रण काचेच्या बाऊलमध्ये मायक्रो मीडियमवर दोन मिनिटे ठेवावे.
एका भांडय़ात क्रीम, कॉर्नफ्लॉवर, मीठ, काळी मिरी व तीन कप पाणी घालून मायक्रोहायवर तीन मिनिटे ठेवावी. हे सर्व मिश्रण मेथीच्या मिश्रणात मिक्स करून मायक्रो मीडियमवर दोन ते तीन मिनिटे ठेवावी व गरम सव्‍‌र्ह करावी.
विवेक ताम्हणे – response.lokprabha@expressindia.com