26 November 2020

News Flash

आंब्याचे पदार्थ

आपण या वेळेस आंब्याचे पदार्थ जाणून घेऊ या.

आपण या वेळेस आंब्याचे पदार्थ जाणून घेऊ या.

 • आंबा आवडत नाही, असे ऐकायला फार कमी मिळते.
 • आंबा हा सर्व लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सर्वाना आवडतो.
 • आंब्यामध्ये व्हिटॅमीन बी-६, व्हिटॅमीन ए आणि व्हिटॅमीन सी खूप अधिक प्रमाणात असते.
 • आंब्यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि तांबे भरपूर प्रमाणात असते.
 • ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो त्यांनी आंबा खाल्ला तर त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
 • आंबा खाल्ल्याने कॅन्सरची भीती कमी होते व कोलेस्टरॉल कमी करण्यात उपयोगी होते.
 • गरोदर स्त्रियांना आंब्यामधून भरपूर प्रमाणात आयर्न मिळते.

मँगो मूस

साहित्य :

 • दोन आंब्यांचा रस काढणे,
 • अर्धा कप क्रीम (दुधावरची घट्ट सायही चालते)
 • दोन टेबलस्पून वाइन किंवा लिकर (ऐच्छिक),
 • एक टे.स्पून मध किंवा साखर,
 • सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स किंवा चॉकलेटचे तुकडे.

कृती :

ब्लेंडरमध्ये आधी रस आणि वाइन तसेच मध किंवा साखर घालून एकजीव करून घेणे. त्यात नंतर क्रीम घालून पुन्हा एकजीव करून घेणे आणि ग्लासमध्ये ओतणे. हा ग्लास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणे.  सेट झाल्यावर ड्रायफ्रुटस् किंवा  चॉकलेट्सचे तुकडे घालून प्यायला देणे.

मँगो सालसा

साहित्य :

 • दोन आंबे सोलून बारीक फोडी करणे,
 • एक टॉमेटोचे बारीक तुकडे करणे,
 • एक कांदा- खूप बारीक चिरणे,
 • १/२ हिरवी मिरची बारीक चिरून घेणे.
 • एक टे स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.
 • एक लिंबाचा रस,
 • चवीप्रमाणे मीठ व मीरपूड.

कृती :

एका बाउलमध्ये सर्व पदार्थ एकत्र करून त्यात मीठ व मीरपूड घालावी त्यामुळे चव वाढते.

टीप :

मँगो सालसा नुसते खायला चांगले लागतेच, पण नाचोज बरोबरसुद्धा चविष्ट लागते.

मँगो वॉटरमेलन स्मूदी

साहित्य :

 • दोन ते तीन कप कलिंगडाच्या फोडी,
 • एका आंब्याच्या फोडी,
 • एक ते दोन टे.
 • स्पून साखर,
 • अर्धा कप पाणी किंवा बर्फाचे तुकडे.

कृती :

दोन्ही फळे व साखर ब्लेंड करून घेणे. ग्लासमध्ये बर्फ किंवा थंड पाणी घालणे त्यावर हा पल्प ओतून स्मूदी प्यायला देणे.

टीप :

या सीझनमध्ये आंबा आणि कलिंगड दोन्ही उपलब्ध आहेत.

मँगो लस्सी

साहित्य :

 • दोन आंबे फोडी करून घेणे,
 • दोन कप आंबट नसलेले दही,
 • अर्धा कप साखर,
 • एक कप बर्फाचे तुकडे.

कृती :

सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंड करून घेणे आणि थंडगार प्यायला देणे.
सीमा नाईक – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 1:06 am

Web Title: mango recipes 2
टॅग Mango,Recipes
Next Stories
1 गारलिक प्रॉन्स
2 ब्रोकोली चीझ बॉल्स
3 राजमा
Just Now!
X