साहित्य :

१ लिटर क्रीम, अंडय़ातील पिवळे बलक, १५० ग्रॅम साखर, २ चमचे कॉर्नफ्लॉवर, ३ ते ४ चमचे वेनिला इसेन्स

कृती :

एका काचेच्या भांडय़ात क्रीम, साखर, वेनिला इसेन्स, अंडय़ाचे पिवळे बलक मिक्स करून मायक्रो लोवर २ मिनिटे ठेवावे. सर्व मिश्रणाला स्थिर करून (हळुवार) मायक्रो लोमध्ये २ मिनिटे ठेवावे. परत सर्व मिश्रणाला स्थिर करून (हळुवार) मायक्रो लोमध्ये २ मिनिटे ठेवावे. असे केल्यामुळे सॉस फाटत नाही. पण याबरोबर काळजी घ्यायची की या सॉसला जास्त मिक्स करायचे नाही. हा सॉस थंड झाल्यावर डीप फ्रिजमध्ये ठेवावा. अध्र्या तासाने बाहेर काढून परत मिक्स करून डीप फ्रिजरमध्ये ठेवावा. त्यानंतर फायनल आइसक्रीम डीप फ्रिजरमध्ये सेट करावे.

आपल्याकडे आइसक्रीम मशीन असल्यास थंड झालेला सॉस आइसक्रीम मशीनमध्ये टाकून आइसक्रीम बनवून घ्यावे. हे आइसक्रीम हॉट स्ट्रॉबेरी सॉसबरोबर सव्‍‌र्ह करावे.

बेक फिश (सुरमई)

साहित्य :

३५० ते ४०० गॅ्रम सुरमई साफ केलेली, १ वाटी कांदा बारीक चिरलेला, ४ ते ५ पाकळ्या लसूण बारीक चिरलेले, ३ ते ४ चमचे ऑलिव्ह ऑईल, २ ते ३ टॉमेटो बारीक चिरलेले, ३ ते ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धी जुडी कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ चवीनुसार.

कृती :

एका काचेच्या भांडय़ात लसूण, कांदा, ग्रीन चिली, ऑईल घेऊन त्यात ४ ते ५ चमचे पाणी टाकून मिक्स करून घ्यावे. भांडय़ावर झाकण ठेवून ५ ते ६ मिनिटे मायक्रो ओव्हनमध्ये कुक करून घ्यावे.

एका पसरट काचेच्या भांडय़ात सुरमई व तयार केलेले मिश्रण ठेवून ३ ते ४ मिनिटे मायक्रो मीडियमवर ठेवावे. त्यावर चॉप केलेले टोमॅटो  मीठ चवीनुसार टाकून मायक्रो लोवर ८ ते १० मिनिटे ठेवावे. सव्‍‌र्ह करायच्या अगोदर त्यावर चिरलेली कोथिंबीर टाकून सव्‍‌र्ह करावे.

चीज आणि वांग्याचे टोस्ट

साहित्य :

५ ते ६ स्लाइस ब्रेड, ५० गॅ्रम चीज, २ वांगी मध्यम आकाराची, १/२ चमचा चिली फ्लेक्स, २ ते ३ चमचे ऑलिव्ह ऑईल, ३ ते ४ लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या)

कृती :

स्लाइस ब्रेडच्या कडा कापून घ्याव्यात, त्यावर चॉप केलेले वांगी चिली फ्लेक्स्, लसूण आणि ऑलिव्ह तेल नीट पसरवून घ्यावे. त्यावर किसलेले चीज टाकून ब्रेड स्लाइसचे छोटे तुकडे करावेत. मायक्रोमध्ये जाणाऱ्या डिशमध्ये हे सर्व तुकडे मायक्रो मीडियमवर २ ते ३ मिनिटे ठेवावे. कुठल्याही स्पाइसी सॉसबरोबर किंवा या टोस्टवरती सॉल्ट पेपर व काळीमिरी भुरभुरून तसेच सव्‍‌र्ह करावे.

ऑरेंज आणि चिकन सूप

साहित्य :

१०० ग्रॅम चिकन बारीक तुकडे केलेले, १ कांदा बारीक चिरलेला, ५० ग्रॅम बटर, २ चमचे  मैदा, २०० मिली मिल्क, ५०० मिली चिकन स्टॉक, २ ते ३ ऑरेंजच्या पाकळ्या (सोललेल्या), मीठ चवीनुसार, अर्धा चमचा व्हाइट पेपर पावडर.

कृती :

एका काचेच्या भांडय़ात बटर मेल्ट करून घ्यावे. त्यात चिकन व बारीक केलेला कांदा टाकून मायक्रो लोवर ६ ते ८ मिनिटे ठेवावे. त्यानंतर त्यात मैदा टाकून नीट मिक्स करून घ्यावे. त्यामध्ये चिकनचा स्टॉक टाकून मायक्रो लोवर ५ ते ६ मिनिटे ठेवावे. नंतर दूध व ऑरेंजच्या पाकळ्या टाकून मायक्रो लोवर ठेवून ३ ते ४ मिनिटे ठेवावे. मीठ चवीनुसार टाकून सव्‍‌र्ह करावे.

हॉट स्ट्रॉबेरी सॉस

साहित्य :

२५० ग्रॅम स्ट्रॉबेरी, ३ ते ४  चमचे साखर, २ चमचे लेमन ज्यूस

कृती :

स्ट्रॉबेरी, लेमन ज्यूस व साखर टाकून मिक्सरमधून वाटून किंवा मिक्स करून घ्यावे. त्यात एक वाटी पाणी टाकून मायक्रो लोवर ६ ते ८ मिनिटे ठेवावे. हा सॉस बारीक गाळणीतून गाळून घ्यावा.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com