01 March 2021

News Flash

स्मूदी

स्मूदीचा रस मिल्कशेकसारखा घट्ट असतो.

स्मूदी हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही. स्मूदी म्हणजे घट्ट भाजी किवा फळांचा रस, हा रस पाणी किवा दूध घालून काढलेला असतो. स्मूदीचा रस मिल्कशेकसारखा घट्ट असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर स्मूदी म्हणजे एक प्रकारचा मिल्कशेकच आहे. भरपूर विटामिनयुक्त स्मूदीने दिवसाची सुरुवात चांगली करता येते. ब्रेकफास्टला किंवा दुपारच्या जेवण्याच्याऐवजी स्मूदी घेतली तरी पोट चांगलंच भरतं.

तुम्ही तर नेहमी स्मूदी पिणार असलात तर फळे फ्रिझरमध्ये ठेवावीत म्हणजे स्मूदीमध्ये बर्फ घालायची गरज पडत नाही. कोणतीही स्मूदी तयार करताना त्यात तुम्ही दालचिनी पूड, ओट्स, जायफळ पूड, कोको पावडरही घालू शकता. भरपूर प्रोटिनयुक्त स्मूदी करायची असेल तर त्यात प्रोटिन पावडर, किवा शेंगदाणेही घालू शकता.

तेव्हा आज आपण स्मूदीच्या रेसिपी जाणून घेऊ या.

अननस केळी स्मूदी
साहित्य :
बर्फाचे चार तुकडे, चार अननसाचे तुकडे, एक केळे, एक कप अननसाचा ज्यूस किंवा सफरचंदाचा ज्यूस.
कृती :  सर्व एकत्र करून ब्लेंडरमध्ये ब्लेंड करणे.

ऑरेंज गाजर स्मूदी
साहित्य :
एक कप ऑरेंज ज्यूस, अर्धा कप दही, अर्धा कप ओट्स, एक केळे.
कृती : सर्व एकत्र करून ब्लेंडरमध्ये ब्लेंड करणे.

हेल्थी स्मूदी
साहित्य :
अर्धा कप गायीचे दूध, अर्धा कप गायीच्या दुधाचे दही, अर्धे फ्रोझन केळे, दोन टे.स्पून प्रोटीन पावडर (घरात असेल तर वापरा) एक ते दीड चमचा जवसाची पूड, एक टी.स्पून मध, अर्धा कप स्ट्रॉबेरी.
कृती :  सर्व एकत्र करून ब्लेंडरमध्ये ब्लेंड करणे.

हिरवी स्मूदी
साहित्य :
दोन कप साखर, टरबूज कापून घेणे, अर्धा कप काकडी सालासकट, पुदिन्याची १२-१३ ताजी पाने. दोन टे.स्पून लिंबाचा रस, एक टी.स्पून मध.
कृती :  सर्व एकत्र करून ब्लेंडरमध्ये ब्लेंड करणे.
सीमा नाईक –  response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2016 1:06 am

Web Title: smart cooking smoothie
टॅग : Recipes
Next Stories
1 गार्लिक धनिया ब्रेड
2 कलिंगड
3 भरलेली कारली
Just Now!
X