28 January 2021

News Flash

यूपीएससी : हवामानशास्त्र

उत्तर ध्रुववृत्त ते ध्रुवापर्यंतचा प्रदेश तसेच दक्षिण ध्रुववृत्त ते ध्रुवापर्यंताचा पट्टा यास शीतकटिबंधीय पट्टा असे म्हणतात.

शीतकटिबंधीय पट्टा (Polar Zone) : उत्तर ध्रुववृत्त ते ध्रुवापर्यंतचा प्रदेश तसेच दक्षिण ध्रुववृत्त ते ध्रुवापर्यंताचा पट्टा यास शीतकटिबंधीय पट्टा असे म्हणतात. या ठिकाणी सूर्यकिरणे तिरपी पडत असल्यामुळे हा प्रदेश शीतकटिबंधाचा बनलेला आहे. वर्षभर या कटिबंधात कमी तापमान असते.

हवेचा दाब (Air Pressure) : समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जातो तसतसा हवेचा दाब कमी होत जातो. पृथ्वीवरील वारे जास्त पट्टय़ाच्या दाबाकडून कमी दाबाच्या पट्टय़ाकडे वाहतात.

भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे :

* विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा Eqatorial low pressre Belt) : ५ अंश उत्तर आणि ५ अंश दक्षिण या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. या पट्टय़ाला विषुववृत्तीय शांतपट्टा असेदेखील म्हणतात. (Doldrums)
विषुववृत्तीय पट्टय़ात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांना ऊध्र्वगामी हालचाल प्राप्त होते. हे वारे विषुववृत्तीय पट्टय़ात एकत्र येत असल्याने त्यांना आंतर-उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा (ITCI) असे म्हणतात. विषुववृत्तीय कमी दाबाच्या या पट्टय़ात घनदाट जंगले आढळतात. अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात विषुववृत्तीय पट्टय़ात जे जंगल आढळते, त्याला सेल्वास (Selvas) असे म्हणतात.
* कर्कवृत्तीय व मकरवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे : २५ अंश ते ३५ अंश उत्तर ते दक्षिण विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ातून ऊध्र्वगामी बनलेली हवा वर जाते व तेथे थंड होऊन ती कर्कवृत्त व मकरवृत्तावर अधोगामी दिशेने येते त्यामुळे २५ अंश ते ३५ अंश उत्तर व दक्षिण पट्टय़ात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. या पट्टय़ाला उपउष्ण कटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा (Sub Tropical High Pressure Belts) असेदेखील म्हणतात. या पट्टय़ाला अश्वअक्षांश (Horse latitudes) असेदेखील म्हणतात.
* उपध्रुवीय/ समशीतोष्ण कमी दाबाचा पट्टा : दोन्ही गोलार्धात ६० ते ७० अक्षवृत्ताचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून या प्रदेशांत हवेचा दाब हा कमी असतो. पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे या पट्टय़ातील हवा बाहेर फेकली जाते, त्यामुळे हवा विरळ होऊन येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
* ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा : ध्रुवावर तापमान कमी असते व त्यामुळे तेथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
* कोरिऑलिस फोर्स (Coriolis Force): पृथ्वी फिरताना तिच्याभोवती वातावरणही फिरत असते. पृथ्वीच्या या गतीमुळे निर्माण होणाऱ्या शक्तीला कोरिऑलिस फोर्स असे म्हणतात. यांमुळे वाऱ्याच्या मूळ दिशेवर परिणाम होतो. यासंबंधी फेरल या शास्त्रज्ञाने संशोधन केले. त्यानुसार कोरिऑलिस फोर्समुळे वारे हे उत्तर गोलार्धात वाहताना आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे म्हणजे घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने वाहतात तर दक्षिण गोलार्धात हे वारे घडय़ाळाच्या विरुद्ध दिशेने वाहतात म्हणजेच आपल्या मूळ दिशेकडून डावीकडे वाहतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2016 5:42 am

Web Title: meteorology upsc examination 2016
Next Stories
1 एमपीएससी : पर्यावरणशास्त्र (२)
2 यूपीएससी : हवामानशास्त्र
3 एमपीएससी : पर्यावरणशास्त्र (२)
Just Now!
X