खालील स्तंभलेखात १९९२ ते १९९७ या काळात भारतातील परकीय गुंतवणूक दर्शवलेली आहे. ती अभ्यासून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.

भारतातील परकीय गुंतवणुकीचे प्रवाह
14-tab01

* १९९२ ते १९९७ या काळाचा विचार करता एकूण परकीय गुंतवणूक किती झाली आहे?
१) ९३.८२ २) ९३.२२ ३) ९३.१९ ४) यांपकी नाही
स्पष्टीकरण- १९९२ ते १९९७ या वर्षांत एकूण झालेली परकीय गुंतवणूक = ५.७ + १०.१५+ १२.१६ + १०.२२
+ २४.२३ + ३१.३६ = ९३.८२
म्हणून पर्याय क्रमांक १
* १९९६ ते १९९७ या काळातील परकीय गुंतवणुकीतील फरक किती?
१) ७.२९ २) ७.१३ ३) ८.१३ ४) यांपकी नाही
स्पष्टीकरण- १९९६ ते १९९७ या काळातील परकीय गुंतवणुकीतील फरक = ३१.३६ – २४.२३ = ७.१३
म्हणून पर्याय क्रमांक २.
प्रश्न ३ : खालील आकृतीत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांचे प्रमाण दर्शवले आहे ते अभ्यासून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
प्रवेश घेतलेलेविद्यार्थी- ८५५०
14-tab02

उत्तीर्ण झालेलेविद्यार्थी- ५७००
14-tab03

* ‘टी’ या संस्थेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपकी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती?
१) ५०% २) ६२.५% ३) ७५% ४) ८०%
स्पष्टीकरण- १) ‘टी’ या संस्थेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपकी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी =
14-tab04
= ७५% पर्याय = ३
* ‘एस’ आणि ‘पी’ या संस्थेतील उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ‘टी’ आणि ‘आर’ या संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहेत?
१) २२८ २) २७९ ३) ३९९ ४) ४०७
स्पष्टीकरण : ‘एस’ आणि ‘पी’ या संस्थेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि ‘टी’ आणि ‘आर’ या संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील फरक = (५७०० चे (१६% + १८%)) – (८५५० चे (८% + १०%))
= (५७०० चे ३४%) – (८५५० चे १८%)
= १९३८ – १५३९ = ३९९ म्हणून पर्याय- ३
क्यू आणि आर या संस्थेत प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांपकी त्या संस्थेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची
टक्केवारी किती?
१) ६८% २) ८०% ३) ७४% ४) ६५%
स्पष्टीकरण : क्यू आणि आर या संस्थेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
= ५७०० चे (१३% + १७%) = ५७०० चे ३०%
क्यू आणि आर या संस्थेत प्रवेश घेतलेले एकूण विद्यार्थी
= (८५५० चे (१५% + १०%)) = ८५५० चे २५%
14-tab05
पर्याय = २
(उर्वरित गणिते उद्याच्या अंकात)