सी सीसॅट पेपरचे महत्त्व :

मित्रांनो, एमपीएससी (राज्यसेवा) पूर्वपरीक्षा तसेच यूपीएससी (नागरी सेवा) पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्याकरता या प्रश्नपत्रिकेला पर्याय नाही. सामान्य अध्ययनाशी संबंधित असलेल्या सी सॅट पेपर १ या  प्रश्नपत्रिकेच्या अभ्यासाला मर्यादा असतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सी सॅट पेपर २ मध्ये गती असते, त्यांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे सोपे जाते. थोडक्यात, परीक्षेच्या दृष्टीने विचार केल्यास या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या प्रश्नपत्रिकेमध्ये खालील उपघटक समाविष्ट आहेत

  • आकलन. (Comprehension)
  • आंतरवैयक्तिक संवाद व संभाषण कौशल्ये.

(Interpersonal Skills Including Communication Skills)

  • ताíकक विचार व विश्लेषणात्मक क्षमता.

(Logical Reasoning and Analytical Ability)

  • निर्णय प्रक्रिया व समस्यांची सोडवणूक.

(Decision Making And Problem Solving)

  • सामान्य बुद्धिमत्ता चाचणी.

(General Mental Ability)

  • मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण.

(Basic Numeracy)

  • इंग्रजी भाषेचे आकलन.

(English Language Comprehension)

मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करताना सर्वप्रथम कोणत्या घटकांवर किती प्रश्न विचारले गेले आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थ्यांचा असा समज असतो की, सी सॅट पेपर २ म्हणजे गणिताचा पेपर. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, यात गणिताशी संबंधित प्रश्न फारच कमी असतात.

२०१४ ते २०१५ या वर्षांतील पेपरचे विश्लेषण केले तर खालील माहिती हाती येते. ही माहिती अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे-

एमपीएससी पूर्वपरीक्षा २०१४ व २०१५ चे विश्लेषण :

 

वरील विश्लेषणावरून खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात

  • सी सॅट पेपर-२ म्हणजे गणिताचा पेपर नाही. मूलभूत गणितावर फारच थोडे प्रश्न विचारले जातात.
  • आकलन व विश्लेषणात्मक क्षमता हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे.
  • आकलनाची तयारी :

यात उताऱ्यांवरील प्रश्नांच्या आधारे उमेदवाराची आकलन क्षमता तपासली जाते. या विभागावरील प्रश्न सोडविण्यासाठी उमेदवाराला जास्तीत जास्त ५५ ते ६० मिनिटे  देता येतात.

  • इंग्रजी भाषेच्या आकलनाची तयारी :

इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य तपासण्याासाठी जो उतारा दिलेला असतो, तो फक्त इंग्रजीत असतो. त्याचे भाषांतर केलेले नसते. साधारणत: याचा स्तर दहावी ते बारावी इयत्तेपर्यंत असतो. हे उतारे  सोपे असल्यामुळे यात हक्काचे गुण प्राप्त करण्याची संधी असते. मात्र उताऱ्यावरील प्रश्न वेळेत सोडविण्यासाठी उमेदवारांनी अधिकाधिक उताऱ्यांवरील प्रश्न सोडविण्याचा सराव अवश्य करावा.

  • ताíकक विचार व विश्लेषणात्मक क्षमता

(Logical Reasoning and Analytical Ability)

कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. या घटकात गुण कमावण्याची उत्तम

संधी उपलब्ध असते. मात्र, या घटकावरील प्रश्न सोडविण्यासाठी तुलनेने जास्त वेळ लागतो. हा वेळ वाचविण्यासाठी या प्रश्नांचा अधिकाधिक सराव करणे गरजेचे आहे. या घटकावरील प्रश्नांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात :

  • शाब्दिक बुद्धिमत्ता : (Verbal Reasoning)
  • अशाब्दिक बुद्धिमत्ता: (Non-Verbal Reasoning)