News Flash

एमपीएससी : आकलन उपघटकासंबंधीची महत्त्वाची निरीक्षणे

सीसॅट पेपर-२ सोडवताना आकलनक्षमता या विभागाला जास्तीत जास्त ५५ ते ६० मिनिटेच देता येतात

आकलन उपघटकासंबंधीची  महत्त्वाची निरीक्षणे उर्वरित प्रश्न :

* बांगलादेशातील घटनांबाबत भारताची जबाबदारी वाढली कारण-

१)          ते एके काळचे भारतीय बांधवच होते.

२)         निर्वासितांचे लोंढे भारतात येत होते.

३)         बांगलादेश स्वातंत्र्यासाठी भारताने मदत करणे भारताचे कर्तव्यच होते.

४)         विचार १, २ व ३ बरोबर आहे.

* वरील उताऱ्यावरून इंदिरा गांधींचे कोणते विचार स्पष्ट होतात?

१)          बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामात बांगलादेशातील नागरिकांचा सहभाग होता, त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधींना चिरडून टाकणाऱ्या पाशवी शक्तीविरुद्ध लोकांनी जे बंड केले, त्यांना साथ देणे आवश्यक आहे असे इंदिरा गांधींना वाटले.

२) उताऱ्यावरून असे स्पष्ट होते की, पाकिस्तानपासून बांगलादेशला तोडण्याची ही सुवर्णसंधी होती.

१) विधान १ बरोबर  ३) विधान १ व २ बरोबर

२) विधान ३ बरोबर            ४) विधान १ व २ चूक

परीक्षेमध्ये आकलनविषयक उतारे सोडवताना लक्षात ठेवण्याचे मुद्दे :

  • परीक्षा कक्षात उमेदवारावर मानसिक ताण असतो. त्यामुळे बऱ्याचदा पेपर सोडवताना ठाऊक असलेल्या गोष्टींतही घाई केल्याने मोठय़ा चुका होतात. आकलन हा घटक असा आहे की ज्यात अधिक गुण मिळविण्याची संधी उपलब्ध असते. सर्वप्रथम उताऱ्यांची संख्या किती, लहान उतारे किती, मोठे उतारे किती व इंग्रजी उतारे किती हे लक्षात घेऊन वेळेचे नियोजन करावे.
  • उतारा एकाग्रतेने सविस्तर वाचावा, जेणे करून तो पुन्हा वाचण्याची गरज पडणार नाही.
  • उतारा वाचताना महत्त्वाची वाक्ये पेनाने किंवा पेन्सिलने अधोरेखित करून ठेवावीत. उताऱ्यात लेखकाला काय मांडायचे आहे ते समजून घ्यावे.
  • सीसॅट पेपर-२ सोडवताना आकलनक्षमता या विभागाला जास्तीत जास्त ५५ ते ६० मिनिटेच देता येतात आणि या ठरावीक वेळेमध्ये सुमारे १० ते ११ उतारे आणि त्यांवरील प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. या सर्व बाबींचा विचार केला तर एक उतारा वाचून त्यावरील प्रश्न सोडविण्यास जास्तीत जास्त सहा ते सात मिनिटे वेळ मिळतो.

सरावासाठी उतारा

उताऱ्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.

१८५९ मध्ये जॉनने आपल्या एका सहकाऱ्यासमवेत- मॉरिस क्लार्क- त्यांचा पहिला तेलशुद्धीकरण प्रकल्प बांधला. क्लीव्हलँडच्या औद्योगिक क्षेत्रात तयार झालेला तो पहिला औद्योगिक तेल प्रकल्प होता. अँड्रय़ूज, क्लार्क आणि कंपनीकडे त्याची मुळातली मालकी होती. १८६५ मध्ये एका ऐतिहासिक लिलावात ७२,५०० डॉलर्स एवढी घसघशीत रक्कम देऊन जॉनने क्लार्क बंधूंचे समभाग खरेदी केले आणि प्रकल्प पूर्णपणे रॉकफेलर आणि अँड्रय़ूज या नावाने काम करू लागला. १८६६ मध्ये जॉनच्या भावाने विल्यमने आणखी एक तेलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला.

जानेवारी १८७० मध्ये या सर्व छोटय़ा-मोठय़ा प्रकल्पांचे विलीनीकरण करून ओहोयो स्टँडर्ड ऑइल या नव्या मोठय़ा कंपनीची स्थापना करण्यात आली. रेल्वेचे जाळे ओहोयो प्रांतात विणले जात होते. तेलाची वाहतूक करण्यासाठी रेल्वेमार्गाचा वापर सुरू झाला. एल्वे त्यासाठी स्टँडर्ड ऑइलला खास सवलत देऊ लागले. स्टँडर्ड ऑइल ही आता देशातील सर्वात मोठी तेल कंपनी बनली होती. रेल्वेचे भाव भडकल्यावरही फक्त स्टँडर्ड ऑइलला किफायतशीर सवलतीचा दर लावला गेला. यावर खूप वादंग झाला. जॉन रॉकफेलर या वादविवादामुळे जराही विचलित झाला नाही. स्पर्धा करायची, प्रतिस्पर्धाचे प्रकल्प विकत घ्यायचे, ते स्टँडर्ड ऑइलमध्ये विलीन करायचे, ते विकसित करायचे आणि उत्पादन वाढवायचे हा त्याचा खाक्या होता. १८७२ मध्ये क्लीव्हलँडमधील २६ पकी २२ प्रकल्प स्टँडर्ड ऑइलच्या ध्वजाखाली काम करत होते. एकेकाळचे त्याचे कट्टर विरोधक प्रँट आणि रॉजर्सही त्याच्याबरोबर काम करू लागले. स्टँडर्ड ऑइलमध्ये त्यांना सन्मानाच्या जागा मिळाल्या. प्रतिस्पर्धी जॉन रॉकफेलरची आíथक ताकद पाहूनच गर्भगळित होत आणि शरणागतीचे पांढरे निशाण फडकवीत. विलीनीकरणाचा प्रस्ताव हा दिवाळखोरीपेक्षा सुज्ञतेचा असल्यामुळे ते त्याचा स्वीकार करीत.

(उताऱ्याचा पुढील भाग त्यावर आधारित प्रश्न उद्याच्या अंकात..)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 5:41 pm

Web Title: mpsc competitive exams guidance by loksatta 9
Next Stories
1 यूपीएससी २०१६ : इतिहासाच्या अभ्यासाची रणनीती
2 एमपीएससी : आकलन या उपघटकासंबंधीची
3 यूपीएससी : वेळेचे व्यवस्थापन
Just Now!
X