23 August 2019

News Flash

एमपीएससी

जल आणि मृदा यांमधील प्रदूषके काढून टाकण्यासाठी वनस्पतींचा वापर केला जातो.

पर्यावरणशास्त्र (१)
tab01

= फायटो रेमिडिएशन : जल आणि मृदा यांमधील प्रदूषके काढून टाकण्यासाठी वनस्पतींचा वापर केला जातो. उदा. जलपर्णी. ही पाण्यातील वनस्पती असून ती पाण्यातील सायनाइडसारख्या घटकांचे शोषण करून घेते. ब्रासिका आणि दलदल परिसंस्थेत आढळणाऱ्या काही वनस्पती सेलेनियम या प्रदूषकाचे शोषण करतात.
= यू एन रेड (UN- REDD- R- Reduced, E-Emmissions, D- Deforestration and D-Degradation of forest) : वातावरणातील कार्बन डायऑक्साइड एका ठरावीक पातळीत राहणे आवश्यक असते. बऱ्याचशा कार्बन डायऑक्साइडचे शोषण वनांमार्फत होत असते. मात्र, जंगलतोडसारख्या कारणांमुळे कार्बन साठय़ांमध्ये वाढ झाली आहे यालाच वनतोड व वनांच्या अवनतीमुळे होणारे उत्सर्जन असे संबोधले जाते. रेड ही अशी व्यवस्था आहे की, ज्याद्वारे विकसनशील देशांना वनांचे संरक्षण, त्यांचे व्यवस्थापन यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या प्रक्रियेत विकसनशील देशांना वनांचे संरक्षण करण्यासाठी विकसित देशांकडून काही आíथक मदतही दिली जाते. रेड हा कार्यक्रम सध्या बदलून आता त्याचे स्वरूप सुधारित ‘रेड प्लस’ असे झाले आहे.
= दलदलीय परिसंस्था (Wetlands) : दलदलीय परिसंस्था या अत्यंत महत्त्वाच्या असून या ठिकाणी विविध वनस्पती, वृक्ष आणि जलीय प्राण्यांचा अधिवास असतो. या परिसंस्थांची उत्पादकताही सर्वात जास्त असते. स्थलांतर करणाऱ्या बहुतेक प्रजाती या दलदलीय परिसंस्थेवर अवलंबून असतात. दलदलीय परिसंस्थांत असणारी अन्नाची उपलब्धता वनस्पतींचे आच्छादन आणि जमिनीवरील भक्षकांपासून मिळणारे संरक्षण यांमुळे पाणपक्षांसाठी उत्तम निवासस्थाने आहेत. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे या परिसंस्थांची अतोनात हानी होत आहे. अनेक परिसंस्था नष्ट होत आहेत. त्यामुळे जगातील जैवविविधता संपन्न परिसंस्थांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.
tab02
= रामसर करार : हा करार दलदलीय परिसंस्थांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी करण्यात आलेला आहे. इराणमधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ मध्ये हा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला आणि १९७५ पासून हा करार अमलात आला.
= भारतातील रामसर क्षेत्र : अष्टामुडी (केरळ), चिल्का सरोवर (ओडिशा), ओकेरा (जम्मू काश्मीर), कोलेरू सरोवर (आंध्र प्रदेश), रेणुका (हिमाचल प्रदेश), रोपर (पंजाब), सांभर सरोवर (राजस्थान), त्सो मोरारी (जम्मू काश्मीर), वुलार सरोवर (जम्मू काश्मीर), भितरकणिका खारपुटीची वने (ओडिसा), हरिक (पंजाब), लोकटक सरोवर (मणिपूर), पोंग धरण सरोवर (हिमाचल प्रदेश), वेंबनाड- कोल (केरळ) इत्यादी.
रामसर यादीत समाविष्ट असलेल्या क्षेत्रांपकी वेंबनाड – कोल (केरळ) हे सर्वात मोठे तर रेणुका (हिमाचल प्रदेश) हे सर्वात लहान असे दलदलीचे क्षेत्र आहे.
लेखन : डॉ. जी. आर. पाटील

First Published on April 1, 2016 5:55 am

Web Title: mpsc exam paper
टॅग Mpsc,Mpsc Exam