भूगोल नियोजन
भूगोल हा उपघटक यूपीएससी, राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर- १, मुख्य परीक्षा पेपर- १ तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतर परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उपघटक आहे.
भूगोल या घटकाच्या अभ्यासक्रमाचे विभाजन साधारणपणे खालील प्रकारे होऊ शकते-
= प्राकृतिक भूगोल- बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार हा उपघटक पूर्वपरीक्षेसाठी व मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाचा ठरतो. यात पृथ्वीच्या अंतरंगाची रचना, खडक, खडकांचे प्रकार, ज्वालामुखी भूकंप, ज्वालामुखी व भूकंपाचे जागतिक वितरण भुरूपिकी चक्रांची संकल्पना, नदीने, हिमनदीने, वाऱ्यांनी तसेच समुद्रतटावर तयार झालेल्या भूरूपांचा अभ्यास करावा याशिवाय भारताचा प्राकृतिक भूगोल व महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल अभ्यासावा.
= हवामानशास्त्र- प्रत्येक परीक्षेला या उपघटकावर प्रश्न विचारले जातातच. यात वातावरणीय घटक आणि त्याची संरचना उदा. तपांबर, स्थितांबर, आयनांबर यांचा अभ्यास, हवेचे तापमान, हवेचा दाब, तापमानाचे वितरण, तापमानाचे आडव्या दिशेतील व क्षितिज समांतर वितरण, भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे, ग्रहीय वारे ((planetary winds), आवर्त, प्रत्यावर्त या उपघटकांबरोबरच महाराष्ट्रीय हवामान, त्याची वैशिष्टय़े, भारतीय हवामान, त्याची वैशिष्टय़े यांचाही अभ्यास करावा. हा घटक समजण्यासाठी अत्यंत सोपा आणि रंजक आहे. मात्र, या उपघटकावरील प्रत्येक संकल्पना पाठ करण्यापेक्षा समजून घ्याव्यात.
= मृदा (Soil’)- मृदा निर्मितीची प्रक्रिया आणि घटक, मृदेमधील खनिजे व सेंद्रीय घटक, वनस्पतींची आवश्यक पोषणमूल्ये, मृदेच्या समस्या आणि त्या सुधारण्याच्या पद्धती, महाराष्ट्रातील व भारतातील मृदेचे वितरण उदा. काळी मृदा, जांभा मृदा इत्यादी तसेच जमिनीची धूप आणि धुपेचे प्रकार यांचा अभ्यास करावा.
= लोकसंख्या भूगोल- भारतातील लोकसंख्येचे वितरण, स्थलांतर, स्थलांतराची कारणे, पूर्वपरीक्षेला साधारणत: २ ते ३ प्रश्न या उपघटकावर विचारले जातात. मात्र, मुख्य परीक्षेच्या दृष्टीने हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. मुख्य परीक्षेला साधारणत: ८ ते १० प्रश्न यांवर विचारले जातात. म्हणून अभ्यास करताना हा उपघटक व्यवस्थित अभ्यासावा. लोकसंख्येच्या दृष्टीने पहिली दहा राज्ये, शेवटची दहा राज्ये, घनतेच्या दृष्टीने पहिली दहा राज्ये, शेवटची दहा राज्ये, लोकसंख्येतील स्त्री-पुरुष प्रमाण, त्याचे वितरण, यानुसार पहिली पाच व शेवटची पाच राज्ये, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे वितरण, या दृष्टीने पहिली पाच राज्ये व शेवटची पाच राज्ये अशा प्रकारे अभ्यास करावा.
= भारताचा भूगोल- वरील घटक अभ्यासल्यानंतर भारताचा घटक स्वतंत्रपणे अभ्यासावा. हा घटक संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपासून राज्यसेवेच्या सर्व परीक्षांना उपयुक्त आहे. भारताचा प्राकृतिक, सामाजिक व आíथक भूगोल असा शब्दप्रयोग वापरलेला आहे.
* भारताच्या प्राकृतिक भूगोलात भारताचे स्थान, विस्तार, नदीप्रणाली, हवामान, मृदा, नसíगक वनस्पती यांचा अभ्यास करावा. अभ्यासासाठी नकाशाचा वापर करावा, अनेक प्रश्न नकाशाशी संबंधित विचारले जातात.
* भारताच्या सामाजिक भूगोलात भारताची लोकसंख्या व लोकसंख्येचे वितरण, २००१ ते २०११ जनगणनेचा तुलनात्मक अभ्यास करणे अपेक्षित आहे.
= भारताचा आíथक भूगोल- या घटकात भारतातील खनिज साधनसंपत्ती, उद्योगधंदे, कृषी, जलसिंचन, पशुधन व मासेमारी इत्यादी उपघटकांचा अभ्यास करावा.
= जगाचा भूगोल- जगाचा भूगोल हा घटक फक्त पूर्वपरीक्षेलाच विचारला जातो. खरेतर या घटकावर जास्त प्रश्न विचारले जात नाहीत, तसेच हा घटक फक्त पूर्वपरीक्षेला असल्याने सर्वप्रथम खंडानुरूप देश समजून घ्यावेत. नंतर त्यातील डोंगररांगा, नदीप्रणाली, जागतिक हवामान, खनिजसंपत्ती, कारखाने यांचा अभ्यास करावा.
जगातील समुद्र, त्या समुद्राजवळचे देश
यांचा अभ्यास करावा.