लॉर्ड डफरिन (१८८४ – १८८८) : रिपनच्या मुदतपूर्व राजीनाम्यामुळे लॉर्ड डफरिनची व्हाइसरॉयपदी नियुक्ती झाली. डफरिनच्या काळात उत्तर ब्रह्मदेश जिंकून त्याने संपूर्ण ब्रह्मदेश (१८८६) इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणला. मुलकी सेवेत भारतीयांना समाविष्ट केले जावे, म्हणून व्हाइसरॉयने चार्ल्स अ‍ॅचिसन समिती नेमली. चार्ल्स अ‍ॅचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची (पब्लिक सíव्हस कमिशन) स्थापना झाली. १८८७ मध्ये अ‍ॅॅचिसनने लोकसेवा आयोगाविषयीच्या शिफारशी (अहवाल) सादर केल्या.
डफरिनच्या काळात अ‍ॅलन मने (निवृत्त आय.ए.एस. अधिकारी) इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापण्यास पुढाकार घेतला. डिसेंबर १८८५मध्ये मुंबईत तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.
लॉर्ड डफरिनने इम्पिरियल सर्व्हिस कॉर्प्सची स्थापना केली.
लॉर्ड लॅन्सडाऊन (१८८८ – १८९४) : भारतीयांना शासनात सहभाग मिळावा, म्हणून भारतीय विधिमंडळ कायदा (Indian Council Act १८९२) संमत झाला.
सर डय़ुरांड यांनी पूर्व व दक्षिण अफगाणिस्तानची सीमा निश्चित केली. हिलाच ‘डय़ुरांड रेषा’ म्हणतात.
१८९१ साली कामकरी महिला व बालके यांच्या संरक्षणासाठी ‘दुसरा फॅक्टरी अ‍ॅक्ट’ मंजूर केला गेला.
लॉर्ड एल्गीन – २ (१८९४ – १८९९) : याच्या कारकीर्दीत १८९६चा भीषण दुष्काळ पडला. १८९६-९७ मध्ये दुष्काळग्रस्तांसाठी व्हाइसरॉय एल्गीनने हाँगकाँगमधून मुंबई बंदरात अन्नधान्य आणले. या अन्नधान्यासोबत ब्युबॉनिक नावाचा भयंकर प्लेग भारतात आला.
लॉर्ड कर्झन (१८९९ – १९०५) : लॉर्ड कर्झन १८९९ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आला. कर्झन हे भारताला ‘आशियाचा राजकीय आधारस्तंभ’ मानत. व्हाइसरॉयपदी येण्यापूर्वी कर्झन भारतात चार वेळा आलेला होता.
१८९९-१९०० दरम्यान भारतात दुष्काळासोबत एन्फ्ल्युएन्झा व मलेरियाची साथ पसरली. दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्र व गुजरातमध्ये होती. दुष्काळ निवारणार्थ व्हाइसरॉय कर्झनने १९०१ मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली.
१९०१ मध्ये वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला.
१८९९ मध्ये कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्णप्रमाण स्वीकारले.
पोलीस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गरकारभारांची चौकशी करण्यासाठी अ‍ॅन्ड्र फ्रेझर समिती १९०२ मध्ये नेमली. कर्झनने १९०५ मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली.
१९०२ साली सर रॅली यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नियुक्त केले. या कमिशनच्या शिफारशीनुसार १९०४ मध्ये हिंदी विद्यापीठाचा कायदा संमत केला.
१९०१ मध्ये संस्थानिक राजपुत्रांकरता ‘इम्पिरियल कॅडेट कोअरह्णची स्थापना केली.
१९०१ मध्ये इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू झाला. १९०३ मध्ये दुसरा दिल्ली दरबार भरवून अमाप पसा खर्च केला.
कर्झनने पुराणवस्तू संशोधन खाते निर्माण केले. त्यासाठी प्राचीन स्मारक कायदा ((Ancient Monument) संमत करून घेतला.
त्याच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे ७ जुल १९०५ रोजी केलेली बंगालची फाळणी ही होय. तिचा मुख्य उद्देश प्रशासकीय कारणापेक्षा िहदू-मुस्लिम फूट पाडणे हा होता.
सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नियमावली तयार करून त्याने राजकारणात कार्यक्षमता या बाबीला महत्त्व दिले.
कर्झनने भारतात आल्यानंतर १२ खाती नेमून विविध समित्या नेमल्या. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीला ‘समिती प्रशासन’ म्हणतात.

chavadi lok sabha election 2024 maharashtra political crisis
चावडी : जागा चार आणि आश्वासने भारंभार !
Coco island and Pandit Neharu
Loksabha Election 2024: भाजपाचा दावा किती खरा, किती खोटा? पंतप्रधान नेहरूंच्या निर्णयामुळेच भारताने गमावला का कोको बेटांवरील हक्क?
narendra modi
“भारताची आण्विक शस्त्रास्रे नष्ट करण्याचा कट”, पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर आरोप
Edwin Montagu
विश्लेषण: एका मिठाईवाल्याच्या विजयाने ब्रिटिश सरकार हादरले; १९२० सालची निवडणूक का ठरली महत्त्वाची?