सुरुवात कशी व केव्हा करावी?

  • खरे तर स्पर्धा परीक्षांची तयारी पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्षांपासूनच केलेली उत्तम. या परीक्षेसाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या पुस्तकांचे वाचन, आवश्यक असणाऱ्या घटकांची तयारी आणि अवांतर वाचन या साऱ्या गोष्टी पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत पूर्ण होणे परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने उत्तम ठरते. त्यामुळे उमेदवाराची मूलभूत तयारी पूर्ण होते, अभ्यासक्रमाचा आवाका समजतो आणि आपोआपच परीक्षेला सामोरे जाण्यासाठीचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो.
  • या कालावधीत ‘एनसीईआरटी’च्या पाचवी ते बारावीच्या पुस्तकांचे वाचन पूर्ण करावे. थोडक्यात म्हणजे या कालावधीत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासाची तयारी केली तर पदवी संपेपर्यंत परीक्षेचा सुमारे ८० टक्के अभ्यास पूर्ण होतो आणि यश मिळण्याची शक्यता वाढते.
  • मात्र, बऱ्याच वेळा या परीक्षेची समग्र माहिती मिळायला उशीर होतो आणि विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी पदवीनंतर सुरू करावी लागते. पण म्हणून निराश न होता ‘जब जागे तब सबेरा’ या नियमानुसार अभ्यासाला सुरुवात करावी.
  • यूपीएससी परीक्षेच्या तयारीच्या प्रारंभी सर्वप्रथम पाचवी ते दहावीची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके दोनदा-तीनदा सविस्तर वाचावीत. हा परीक्षेच्या तयारीचा  मूलभूत टप्पा असतो.
  • यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. आधुनिक भारताचा इतिहास- बिपीनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत- बिपीनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल- माजिद हुसन, जिओग्राफी थ्रू मॅप- के. सिद्धार्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान- विझार्ड पब्लिकेशन तसेच अर्थशास्त्राचा अभ्यास करताना अर्थशास्त्राच्या संकल्पना समजण्यासाठी दत्ता आणि सुंदरम किंवा रमेश सिंग यांची पुस्तके वाचावीत.
  • भारंभार पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा विषयाच्या मूलभूत पुस्तकांचे वाचन तीन ते चार वेळा केल्यास अधिक फायदा होतो. जितके अभ्याससाहित्य उपलब्ध आहे ते सारे वाचणे परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने आवाक्याबाहेरचे आहे.
  • गेल्या दोन वर्षांचे मुख्य परीक्षेचे पेपर पाहिल्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे यूपीएससी परीक्षेची गांभीर्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लेखनाचा अधिकाधिक सराव करणे आवश्यक आहे.

यूपीएससी परीक्षेची तयारी करताना इंग्रजीचा न्यूनगंड नको:

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचे पेपर (इंग्रजी वगळता सर्व पेपर) आपल्याला मराठीत लिहिता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. मुलाखतदेखील मराठीत देता येते, मात्र स्पर्धापरीक्षेच्या जगात इंग्रजीचे स्थान महत्त्वाचे आहे हे विसरून चालणार नाही. यूपीएससीच्या तयारीसाठीचे अनेक संदर्भग्रंथ इंग्रजीत असतात. हे लक्षात घेत प्रयत्नपूर्वक इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायला हवा. पेपर जरी मराठीत लिहायचे असले तरी विद्यार्थ्यांनी मराठी दैनिकांसोबत एक-दोन आघाडीच्या इंग्रजी दैनिकांचे वाचन करावे. देशी-विदेशी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर आंतरराष्ट्रीय घडामोडींसंदर्भात जे महत्त्वाचे टॉक शॉ होतात, ते नियमितपणे पाहावेत. त्यामुळे विषयाचे वेगवेगळे दृष्टिकोन समजण्यासोबत इंग्रजी भाषेचे ज्ञानही वाढू शकते.

स्पर्धापरीक्षा आणि वेळेचे व्यवस्थापन :

दुसऱ्या-तिसऱ्या प्रयत्नानंतर अपयश आल्यावर विद्यार्थ्यांना इतका अभ्यास करूनही आपल्याला अपयश नेमके का आले, हे उमगत नाही.  स्पर्धापरीक्षेत यश मिळविण्यासाठी अनेक घटक  जुळून येणे गरजेचे असते. समजा, एखादा विद्यार्थी हुशार आहे. त्याने या परीक्षेसाठी दोन-तीन वर्षे कसून मेहनत केली आहे. स्पर्धापरीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असणारे संदर्भग्रंथ त्याने अभ्यासले  आहेत. त्याच्या यशाची सर्वाना खात्री आहे, परंतु जर परीक्षेचा पेपर लिहिताना त्याला वेळेचे नियोजन जमले नाही, तर तो अपयशी ठरतो. स्पर्धापरीक्षेच्या यशासाठी योग्य नियोजनाची अत्यंत आवश्यकता असते. इंग्रजीतील एक वाक्य महत्त्वाचे आहे आणि ते  स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे-  ” का हएोअकछ ळड ढछअठ, हए ढछअठ ळडोअकछ .”