09 March 2021

News Flash

यूपीएससी : आधुनिक भारताचा इतिहास (लॉर्ड कर्झन संबंधीचा उर्वरित भाग..)

कर्झनच्या शेती सुधारणा : १९०० मध्ये पंजाबमध्ये जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा त्याने अमलात आणला.

* फाळणी प्रकरणामुळे तो बराच वादग्रस्त ठरला.
कर्झनच्या शेती सुधारणा : १९०० मध्ये पंजाबमध्ये जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा त्याने अमलात आणला. ज्यान्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली गेली. १९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली. त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा (Pussa) येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता होण्यासाठी
त्याने १९०४ साली सहकारी पतपेढी कायदा केला.
* कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले. ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शवण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल उभारला.
* कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली.
लॉर्ड मिंटो (१९०५ – १९१०) : १९०७ मध्ये लॉर्ड मिंटो याने चीनशी सुरू असलेला अफूचा व्यापार बंद केला.
* मिंटोने मुस्लिम जनतेला चिथावणी दिली. शिमला येथे १९०६ मध्ये स्वतंत्र मतदारसंघाचे वचन दिले.
* १९०९ मध्ये इंडिया कौन्सिल अ‍ॅक्ट, ज्याला ‘मोल्रे मिंटो सुधारणा’ म्हणतात, तो कायदा संमत केला.
व्हॉइसरॉय लॉर्ड हाìडग्ज (१९१०-१६) : लॉर्ड हाìडग्ज याला भारतातील सर्वात लोकप्रिय व्हॉइसरॉय मानले जाते. व्हॉइसरॉय हाìडग्जने दिल्लीत १२ डिसेंबर १९११ रोजी जॉर्ज पंचमच्या स्वागतार्थ दिल्ली दरबार भरवला. त्या वेळी पंचम जॉर्जने बंगाल फाळणी रद्द केली.
* २३ डिसेंबर १९१२ रोजी राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस हलवली. त्या शाही मिरवणुकीवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात हाìडग्ज जखमी झाला. या प्रकरणी रासबिहारी बोस यांच्यावर खटला भरवण्यात आला. हा खटला ‘दिल्ली खटला’ म्हणून ओळखला जातो.
* डिसेंबर १९१४मध्ये पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. भारतीयांनी त्याला बिनर्शत पाठिंबा दर्शवला.
लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६-१९२१) : लॉर्ड चेम्सफोर्डने भारतात येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियात गव्हर्नर जनरल पदावर काम
केले होते.
* १९१९ साली माँटेग्यु – चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा भारत अधिनियम कायदा संमत झाला.
* १९१९ मध्ये पंजाब प्रांतात रौलेट कायदा (काळा कायदा) लागू करण्यात आला.
* १३ एप्रिल १९१९ रोजी जालियानवाला बाग हत्याकांड झाले. त्याचा प्रमुख सूत्रधार जनरल डायर होता.
* १९२०-२१ मध्ये खिलाफत चळवळ व असहकार चळवळ सुरू झाली.
लॉर्ड रिडिंग (१९२१-१९२६) : काँग्रेसमध्ये फेरवादी व नाफेरवादी गट पडले. स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. रिडिंगच्या काळात दुहेरी प्रशासन व्यवस्था व मुडिमन समितीचा अहवाल सादर झाला.
लॉर्ड आयर्विन (१९२६ – १९३१) : आयर्विन काळातच सायमन कमिशन (१९२८) भारतात आले.
* डिसेंबर १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि सविनय कायदेभंग चळवळ (१९३०) सुरू केली. २६ जानेवारी १९३० हा दिवस ‘स्वातंत्र्य दिवस’ गणला गेला.
* आयर्विन काळातच सायमन कमिशनचा अहवाल जाहीर झाला आणि गोलमेज परिषद भरवली गेली.
* ५ मार्च १९३१ रोजी गांधी- आयर्विन करार झाला. गांधी गोलमेज परिषदेला गेले आणि सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2016 7:22 am

Web Title: upsc exam modern indian history
टॅग : Upsc Exam
Next Stories
1 एमपीएससी : (पूर्वपरीक्षा)- डेटा इंटरप्रिटेशन
2 यूपीएससी : आधुनिक भारताचा इतिहास
3 एमपीएससी : (पूर्वपरीक्षा)- डेटा इंटरप्रिटेशन
Just Now!
X