नोकरदारांसाठी घर आणि कामाच्या बाबतीत समतोल राखणं नेहमीच आव्हानात्मक असतं, पण करोना महामारीमुळे आता सर्व संकल्पना बदलल्या आहेत. घरातून काम करताना कामाचे तास वाढले असून दर्जैदार कामात वेळ घालवताना दुसरीकडे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत नसल्याचा तसंच कुटुंबासोबत घालवण्यासाठी वेळ मिळत असल्याचा आनंद अनेकजण अनुभवत आहेत. अनेकांनी या संधीचा फायदा घेत नोकरीच्या निमित्ताने शिफ्ट झालेल्या मेट्रो शहरांमधून पुन्हा आपलं घर गाठलं आहे.

डेटा स्पीड आणि इंटरनेट कनेक्टिव्हीटी दुरून काम करण्यास मदत करत असताना कोणत्या अडथळ्याविना कुठूनही काम करणं सध्या शक्य होत आहे. मात्र घरुन काम करत असताना काही गोष्टींसोबत जुळवून घ्यावं लागत आहे. उदाहणार्थ, कामासाठी जागा मिळावी यासाठी मोठं घर, जेणेकरुन कुटुंबाच्या कॉमन लिव्हिंग एरियात ते येऊ नये.

Mahavitaran Jobs
Mahavitaran Jobs : महावितरण मध्ये नोकरीची संधी! ५३४७ रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली

आपल्या शहरात किंवा शहराच्या बाहेरील भागात निसर्गाचा आनंद लुटत राहण्याचं याआधी पाहिलेलं स्वप्न आता सहज सत्यात उतरु शकतं. गर्दी झालेल्या शहरांमधून बाहेर, मोठ्या घरात जिथे खासगी आणि कार्यालयीने वेळेसाठी पुरेशा जागा असेल. याचा अर्थ जीवनाचा चांगला दर्जा, कमी गर्दी, प्रदूषणमुक्त शहरं जिथे कमी धावपळ असेल.

यामुळे अनेक मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्ग भारतीय मोठी झेप घेत आपल्या काम आणि आयुष्यात समतोल राखू शकतो अशा परिसरात संपत्ती विकत घेत आहेत. याशिवाय स्थिर मार्केट आणि कंपन्यांकडून गृहकर्जावर दिल्या जात असलेल्या उत्तर ऑफर यामुळे घर खरेदी करण्यासाठी ही अत्यंत योग्य वेळ आहे.

यामध्ये फक्त एकच गोष्ट त्यांना थांबवत आहे ती म्हणजे गृहकर्जाला अर्जातील अवजड प्रक्रिया. करोना महामारीमुळे घराबाहेर पडणं आव्हानात्मक झालं आहे. लोकांच्या सुरक्षेचा विचार करता पीएनबी हाऊसिंगने गृहकर्ज प्रक्रिया सोपी करण्यासाठी ऑनलाइन गृहकर्ज अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. या प्लॅटफॉर्मवर आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. कारण यामध्ये ग्राहक कोणाच्याही शारिरीक संपर्कात न येताआपल्या घरातून गृहकर्जासाठी डिजिटली अर्ज करु शकतात.

थोडक्यात आता कागदपत्रांची मोठी फाईल तयार करण्याची गरज नाही. कागदपत्रांच्या तीन कॉपी, कर्ज देणाऱ्या संस्थेच्या सतत चकरा मारणं या गोष्टी बाजूला ठेवून अत्यंत सहज आणि जलद प्रक्रिया करण्यात आली आहे. आता ऑनलाइन शॉपिंग केल्याप्रमाणे अत्यंत सहजपणे कोणीही फक्त काही क्लिक्सवर आपल्या स्वप्नातील घराचा आर्थिक व्यवहार करु शकतात.

कॉन्टॅक्टलेस डिजिटल ऑन-बोर्डिंगसह ग्राहक अनुभव सहज, सोयीस्कर करण्यात आला आहे. ऑनलाइन केवायसी, ऑनलाइन कागदपत्रं अपलोड, ऑनलाइन इ-सायनिंग, पत्ता पडताळणी इत्यादी गोष्टींसोबत सोयीस्कर आणि वेगवान सेवा उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक टप्प्यावर माहितीची स्वयंचलित आणि वास्तविक वेळ यामुळे आपल्या कर्जासंबंधी जलदगतीने निर्णय घेऊ शकतो यासाठी ग्राहक सशक्त आहेत. ग्राहक आपल्या घरातून पाऊल बाहेर न टाकता हे सर्व करु शकणार आहेत.

ग्राहकांचा हा प्रवास असा असणार आहे –
· ग्राहक ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरुन सही करतील.
· ग्राहक केवायसी आणि उत्पन्नाची कागदपत्रं अपलोड करतील.
· डिजिटली क्रेडिट कार्ड, पेटीएमच्या माध्यमातून ग्राहक आपली प्रारंभिक प्रक्रिया शुल्क फी भरतील, अर्जावर इ-साइन करुन सबमिट करतील.
· गृहकर्ज कोणत्याही शारिरीक हस्तक्षेपाशिवाय मान्य केलं जाईल.

प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये याकरिता ग्राहकांना ऑनलाइन कर्ज अर्जाच्या प्रवासात मदत करण्यासाठी एक टीम पूर्णपणे उपलब्ध असणार आहे. याशिवाय मदतीसाठी पीएनबी हाऊसिंग ऑनलाइन गृहकर्ज अर्जावर १० हजारांपर्यंतच्या गिफ्ट वाऊचरचीही ऑफर देत आहे. पीएनबी हाऊसिंग ऑनलाइन गृहकर्ज अर्ज प्लॅटफॉर्म घराच्या फंडिंगचं सर्व ताण काढून घेत आहे, यामुळे भविष्यात आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत सेलिब्रेट करणं शक्य होऊ शकतं.

Visit www.pnbhousing.com to know more.