अवघ्या काही दिवसांपूर्वीच भारतात Airtel 5G Plus सेवा लाँच झाली. देशातल्या एकूण आठ शहरांमध्ये या सेवेचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, सिलिगुडी, नागपूर आणि वाराणसी या शहरांचा समावेश आहे. याशिवाय, एअरटेलकडून अजूनही देशातल्या इतर भागांना समाविष्ट करून घेण्यासाठी नेटवर्क उभारलं जात आहे. मार्च २०२३पर्यंत एअरटेल 5G प्लस सेवा देशातील जास्तीत जास्त शहरांपर्यंत पोहोचणारी ठरू शकेल!

Airtel 5G Plus मध्ये नेमकं वेगळं काय?

Airtel 5G Plus सेवेचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण सध्याच्या इंटरनेट वेगापेक्षा तब्बल ३० पट अधिक वेगवान सुविधेचा विचार करत आहोत. या वेगवान सेवेमुळे आवाजाचा उत्तम दर्जा आणि सुपरफास्ट वेगवान कॉल शक्य झाले आहेत. Airtel 5G Plusमुळे शिक्षण, आरोग्य, बांधकाम, शेती, दळणवळण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. स्मार्टफोन्सवर ऑनलाईन गेमिंगचा जबरदस्त अनुभव या सेवेमुळे शक्य होणार आहे. नजीकच्या भविष्यकाळात Airtel 5G Plus सेवेमुळे स्मार्ट सिटी आणि स्वयंचलित यंत्रणांचा मोठा वापर होत असल्याचं दिसू शकतं. यातून परस्परांच्या अधिक जवळ आलेलं, पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर करणारं आणि तंत्रज्ञानाने समृद्ध अशा भविष्याचा आपण नक्कीच विचार करू शकतो.

WAPCOS Engineer Recruitment or Bharti For 275 Various Posts Check selection process and important details
WAPCOS Recruitment 2024: इंजिनियर्ससाठी नोकरीची संधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू; ‘असा’ करा अर्ज
Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
GE Aerospace going to Invest Rs 240 Crore in Pune Plant Expansion
विमान इंजिनची निर्मिती करणाऱ्या जीई एरोस्पेसची पुण्यात मोठी गुंतवणूक
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

सर्वाधिकपेक्षाही अधिक वेग!

पर्यावरणाच्या दृष्टीने Airtel 5G Plus सेवा ही अधिक उपयुक्त ठरते. याचं कारण म्हणजे यासाठी वापरण्यात येणारी स्पेशल पॉवर रिडक्शन टेक्नोलॉजी. विशेषत: आपण जागतिक तापमानवाढीचा सामना करत असताना अशा गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. Airtel 5G Plus सेवेच्या लाँचिंग सोहळ्यावेळी बोलताना भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गोपाल विठ्ठल म्हणाले, “गेल्या २७ वर्षांपासून भारतीय टेलिकॉम क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमध्ये एअरटेल नेहमीच अग्रभागी राहिलं आहे. आज या प्रवासात अजून एक मैलाचा टप्पा गाठला गेला आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम अनुभव मिळवून देण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचं नेटवर्क उभं केलं आहे. आमच्यासाठी आमचे ग्राहक हे कोणत्याही गोष्टीसाठी केंद्रीभूत असतात. त्यामुळे आमची 5G सेवा ही कोणत्याही 5G मोबाईल हँडसेटवर आणि सध्या ते वापरत असलेल्या सिमकार्डवर वापरता येईल. ग्राहकांसाठी पर्यावरणपूरक 5G सेवा उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आता पूर्ण झाली आहे. लोक ज्या पद्धतीने एकमेकांशी संवाद साधतात, आयुष्य जगतात, काम करतात, खेळतात ती पूर्ण प्रक्रियाच Airtel 5G Plus मुळे बदलून जाणार आहे.”

एअरटेलनं सर्वमान्य आणि सर्वात प्रगत पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरलं आहे. यासाठी ग्राहक कोणताही 5G मोबाईल वापरू शकतात. शिवाय, त्यांच्या सध्याच्या 4G सिमकार्डवरही ही सेवा वापरता येऊ शकेल. त्यामुळे 4G कडून 5G कडे होणारं स्थित्यंतर कोणत्याही अडथळ्याविना होऊ शकेल.

एअरटेल 5G Plus तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी!

एअरटेलकडे देशातलं सर्वात मोठं मोबाईल ब्रॉडबँडचं नेटवर्क आहे. त्यामुळे कंपनी गेल्या वर्षभरात देशातील 5G तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी ठरली आहे. कारण एअरटेलनं केंद्रीय टेलिकॉम विभागाने पुरवलेल्या अनेक 5G वापरकर्त्यांची माहिती आपल्या नेटवर्कवर तपासून पाहिली आहे. हैदराबादमध्ये देशातील पहिल्या 5G नेटवर्कची चाचणी करून एअरटेलनं आपल्याला परस्परांच्या अधिक जवळ आलेल्या भविष्यकाळाची पहिली ओळख करून दिली. एअरटेलनं अपोलो रुग्णालयासह संयुक्तपणे 5G तंत्रज्ञानाने युक्त देशातील पहिली रुग्णवाहिकाही सुरू केली आहे. याशिवाय, एअरटेलनं उत्पादन क्षेत्रात अधिक कार्यक्षमता निर्माण करण्यासाठी बॉश फॅसिलिटीमध्ये पहिलं प्रायव्हेट 5G नेटवर्कही लाँच केलं.

Airtel 5G Plus सेवा फक्त इतक्यावरच थांबत नसल्याचं दाखवून देण्यासाठीच कंपनीनं 5G क्लाऊड गेमिंगचं यशस्वी सादरीकरण केलं. शिवाय, २०२२च्या सुरुवातीला एअरटेलनं 5G सेवेचा वापर करून ‘१७५ नॉटआऊट रिप्लेड’ कार्यक्रमात कपिल देव यांच्या अविस्मरणीय खेळीचं भारतातील पहिलं 5G युक्त लाईव्ह होलोग्राम सादरीकरण केलं. कपिल देव यांची ती खेळी युजर्स त्यांच्या 5G स्मार्टफोनवर पाहू शकत होते!

5G चा वापर कसा सुरू कराल?

आता Airtel 5G Plus मुळे इतक्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करता येणार असतील, तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की या सेवेचा लाभ आपण कसा घेऊ शकतो? पण ते खरंतर खूप सोपं आहे. जोपर्यंत ही सेवा भारतातील इतर शहरांमध्येही पोहोचत नाही, तोपर्यंत वर उल्लेख केलेल्या आठ शहरांमधील 5G स्मार्टफोन असणारे एअरटेल ग्राहक कोणत्याही अतिरिक्त चार्जेसशिवाय सध्याच्या डाटाप्लॅनमध्येच या सेवेचा लाभ घेऊ शकतात. एअरटेल 4G सिमकार्ड हे आधीपासूनच 5G सेवेसाठी बनवण्यात आलं असल्यामुळे ते 5G स्मार्टफोन्समध्येही वापरता येऊ शकेल. तुम्हाला फक्त दोनच गोष्टी बघायच्या आहेत. तुमचा स्मार्टफोन 5G आहे का? आणि तुमच्या शहरात Airtel 5G Plus सेवा उपलब्ध आहे का?

मग तुम्ही वाट कसली बघताय? Airtel 5G Plus सोबत 5G क्रांतीमध्ये सामील होण्यासाठी तयार व्हा!